शिवामृतच्या उपपदार्थाना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद : धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज (कटुसत्य वृत्त) :- शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाने तयार केलेल्या उपपदार्थांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असून भविष्यात यामध्ये वाढ होवून त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होइल असा विश्वास संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला .
शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाची ४५ वी अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, संघाचे मार्गदर्शक संचालक राजसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील , व्हा.चेअरमन सावता ढोपे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सभासदांनी या विषयांना ऑनलाईन मंजुरी दिली .
मोहिते पाटील म्हणाले, मागील वर्ष हे अत्यंत कठीण गेले. कोरोनाच्या महामारीत दुध व दुग्धजन्य पदार्थ चे मागणीत प्रचंड घट झाल्याने खाजगी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 17 ते 18 रुपये दर दिला गेला. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना प्रति लिटर पंचवीस रुपये प्रमाणे दर शिवामृत दूध संघामार्फत देण्यात आला. आज संघाला सहकारी व खाजगी अशा सुमारे २१३ संकलन केंद्राव्दारे ८3 हजार लिटर दुध पुरवठा केला जातो . आपण केंद्र शासनाकडे पावडर प्लॅंटचा प्रस्ताव दिला आहे . तो लवकरच मंजूर होइल . अनेक संस्था , संकलन केंद्रे आपल्याला दूध घालू इच्छितात . पावडर प्लॅंट झाला तर दैनंदिन सुमारे अडीच लाख लिटर दुधाची गरज आपल्याला लागणार आहे . तसेच संघाचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी १० लाखांचा तर मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी २५ लाखांचा विमा उतरवला असल्याचेही ते म्हणाले . तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधन वाढवावे. शिवामृत संघ सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून विजयरत्न सहकारी संघाने मुरघास निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या मुरघासाचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा व तालुक्यातील दूध उत्पादन वाढविण्यास मदत करावी. त्यास संघ सहकार्य करेल. संघाचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी १० लाखांचा तर मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी २५ लाखांचा विमा उतरवला असल्याचेही ते म्हणाले
0 Comments