अनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतली आमदार यशवंत माने यांनीलस
मोहोळ तालुक्यातील लसीकरण मोहिमेचा घेतला सविस्तर आढावा
मोहोळ (कटुसत्य वृत्त) :- मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे दक्ष आमदार यशवंत माने यांनी अनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली.अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी आज कोव्हीशिल्ड हि कोरोना प्रतिबंधक लस घेऊन पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, डॉ. संतोष गुजरे उपस्थित होते. प्रारंभी वैद्यकिय अधिकारी डॉ. शेरअली मुल्ला यांनी उभयतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी आमदार माने यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लसीकरणास पात्र झालेल्या परंतु अद्यापही लस न घेऊ शकलेल्या ज्येष्ठ बंधु -भगिनिंनी कसलीही काळजी न करता व भिती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत शासनाच्या आदेशाचे पालन करुन वाढत चाललेल्या कोरोनाला कमी करण्याचे आवाहन केले.लसीकरण सुरू झाल्यापासून आज अखेरपर्यंत ७०० नागरिकांनी लस घेतल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शेर अली मुल्ला यांनी सांगीतले लसीकरणासाठी आरोग्य विस्तार अधिकारी मंगल खरात, निशा शिंदे, सुमन गोरे, ज्ञानेश्वर नागरगोजे, श्रध्दा ऐनकपळे, सोनाली पाटेकर, ज्योती तोडकर, शितल सावंत, वृषाली थिटे, श्रीदेवी वाघमोडे, आर.बी. कांबळे, दिग्वीजय लवळे, रवीकिरण आरडक, संतोष कोळी आदी सहकार्य करीत आहेत.
करोनाशी शारीरिकदृष्ट्या सक्षमपणे लढा देण्यासाठी कोविशिल्ड ही लस अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लसीकरण करण्यास पात्र असलेल्या परंतु अद्याप न घेतलेल्या सर्व ज्येष्ठ बंधू-भगिनींनी कसलीही काळजी न करता दक्ष राहून हे लसीकरण करून घ्यावे.
आमदार यशवंत माने
मोहोळ विधानसभा मतदारसंघ
शुक्रवारी आमदार यशवंत माने यांनी संपूर्ण मोहोळ तालुक्यातील अनगरसह ग्रामीण आरोग्य केंद्रातील कोविड-१९ विभागातून केले जाणारे लसीकरण, अँटिजन, आरटीपीसीआर चाचणीची सुविधा व रोजचा लसीकरण पुरवठा तसेच शिल्लक याबाबत सविस्तर आढावा घेतला. मोहोळ तालुक्यातील सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांवर जास्तीत जास्त भर दिला असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विभागाच्या वतीने यावेळी आ.माने यांना सांगण्यात आले. मोहोळ ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील एकूण ६ केंद्रांवर ही लसीकरण मोहीम सुरू असून सोमवार ते शनिवार दररोज तालुक्यात नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
0 Comments