उपचारांना नवीन तंत्रज्ञानाची जोड द्यावी- मोहिते-पाटील
अकलुज (कटूसत्य वृत्त):- दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या पाहता डॉक्टरांचीही गरज वाढत आहे. डॉक्टरांनी ही नवनवीन उपचार पध्दती, तंत्रज्ञान आणि औषधांचा माहिती घेणे गरजेचे असुन उपचाराला नवीन तंत्रज्ञानाची जोड देवुन रुग्णांना व्याधी मुक्त करावे असे आवाहन अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी डॉक्टरांना केले.
गुड्डी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शंकरनगर येथे डॉ.श्रीकांत सुनिल बांगर यांच्या अकलाई क्लिनिकचे उद्घाटन मदनसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ.संजय सिद, शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल आव्हाड, डॉ.सौरभ गायकवाड,दंत शल्य चिकित्सक डॉ .सावन पालवे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.त्यावेळी मोहिते पाटील यांनी उत्तम आरोग्याच्या माध्यमातून दिर्घायुष्याचा कानमंत्र दिला.
मदनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना उदिष्ट दाखवावे.शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंब देशाची प्रगती साध्य होत असते, प्रगतीचे दार खुले होते.यामुळे मुलांमध्ये क्षमता निर्माण करुन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
अकलूज विषयी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की, मेडिकल हब म्हणून अकलूज उदयास आले आहे.येथे मिळणाऱ्या सुविधा,मुलभुत गरजांची होणारी पुर्तता यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अकलूज ने प्रगती केली आहे.तसेच वेळीत घेतलेले उपचारच दिर्घायुष्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर संजय सिद, डॉक्टर अमोल आव्हाड यांनीही आरोग्य व उपचारांचे महत्त्व सांगुन डॉ.श्रीकांत बांगर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार,भारत मगर,पत्रकार कृष्णा लांवंड, पत्रकार नागेश लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डांगे यांचेसह आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व परीसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश लोंढे आणि प्रा.सचिन सोनवने यांनी यांनी केले तर आभार डॉ.सावन पालवे यांनी मानले.

No comments:
Post a Comment