दयानंद शिक्षण संस्थेत नूतन खा.डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

दयानंद शिक्षण संस्थेत नूतन खा.डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

 दयानंद शिक्षण संस्थेत नूतन खा.डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माझ्या जीवनात दयानंद शिक्षण संस्थेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. सोलापूरची लेक आणि दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून मिळणारी ओळख अभिमानाची आहे. जीवनात ज्ञानाशिवाय पर्याय नाही. हे प्रत्येकाने जाणून आपले कार्य चालू ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नूतन खा.प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
         येथील डी.ए.व्ही. कॉलेज ट्रस्ट अँण्ड मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली संचलित,  दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यसभेच्या नूतन खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. खा.प्रा.डॉ. ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत पुढील सहा वर्षात सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
         यावेळी प्रशासक प्राचार्य डॉ.व्ही.पी. उबाळे यांनी खासदार प्रा.डॉ.ज्योती वाघमारे या आमच्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर त्यांचे पीएच. डी. चे मार्गदर्शक प्रा. डॉ. टी.एन. कोळेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.आनंद मसलखांब व प्रा. गणेश सातालोलू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. जे. गायकवाड, लेखापाल विश्वनाथ  बिराजदार यांची विशेष उपस्थिती होती. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages