श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 



      


माळीनगर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील अकलूज-टेंभुर्णी रोडवरील तांबवे-पायरीचा पूल(दत्तवाडी) येथे श्री एकमुखी दत्त प्रभूंच्या मंदिरात  श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाcनिमित्ताने शुक्रवार दि.२० मार्च रोजी एक दिवसीय श्री विष्णु याग व श्री स्वामी याग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती श्री दत्त मंदिर समितीचे सदस्य बापू तात्या मुंडपणे यांनी दिली.                                  
               श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त  दि.२० मार्चला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री विष्णु याग व श्री स्वामी याग यामध्ये प्रायश्चित, प्रसादसंकल्पन, पंचांगकर्म,मंडलदेवता तास्थापन, अभिषेक,अग्निमंथन, नवग्रह हवन, महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दु. ३ ते ५ या काळात वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र या विषयावर प्रश्न-उत्तरे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
           त्याचप्रमाणे सायं. ५ ते ७ यावेळेत वारकरी भूषण ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ,देशमुखवाडी यांचे हरिकीर्तन होणार आहे. तसेच सायं.७ वाजता फुलांचा कार्यक्रम आणि सायं.७ ते ९ वाजेपर्यंत सर्व भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात  आलेली आहे.  
         या श्री स्वामी समर्थ प्रकट दिना कार्यक्रमा दिवशीचे अन्नदाते माजी पं.स.सदस्य अनिल जाधव (महाळुंग) व मोहोळ चे संतोष वायचळ हे आहेत. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम  नाशिक येथील यज्ञाचार्य मयूर परेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून श्री स्वामी समर्थ व श्री दत्त भक्तांनी या कार्यक्रमासाठी शुक्रवारी उपस्थित राहावे असे आवाहन मनोकामना पूर्ती श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे सदस्य आबासाहेब साळुंखे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages