पुरुष यांचा सुधारक सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सोलापूर व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प या अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र यशवंतनगर अंतर्गत Gender Sensitive Role Model Award सन्मान सुधारक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला. सदर पुरस्कार हा महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणारे व गावपातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या व महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुष यांचा सुधारक सन्मान पुरस्कार कार्यक्रम ट्रॉफी,शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे गावस्तरावर Men Gender Sensitive Role Model घडविणे,महिलांसाठी सक्षम व पुरक वातावरण निर्माण करणे आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे हा आहे.सदर कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय सोलापूरचे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर संतोष बोरमवाड,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलूजचे शाखा व्यवस्थापक महेश गव्हाणे, बँक ऑफ इंडिया अकलूज शाखेचे प्रज्वल देशमुख तसेच माळीनगर येथील डॉ. सौ.विनया हाके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी गिरमे यांनी केले. कार्यक्रमा वेळी डॉ. विनया हाके यांनी मार्गदर्शन केले,त्याचबरोबर माविम मित्र मंडळातील राजेश कांबळे,दशरथ नवगिरे,विशाल जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कपल गेम घेण्यात आला.२१ ग्रामसंघांमधून एका पुरुषांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सीएमआरसीच्या अध्यक्षा सौ.जयश्री एकतपुरे,सचिव राजश्री जाधव,कोषाध्यक्षा कौसर शेख व सर्व कार्यकारी मंडळ उपजीविका सल्लागार आकाश लोंढे,क्षेत्र समन्वयक रिजवाना शेख,वैशाली कांबळे,मनीषा गवळी हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सीआरपी यांनी परिश्रम घेतले.
.png)
No comments:
Post a Comment