माळेवाडी अकलूज येथे कोरोना तपासणी करून घेणेसाठी प्रभात फेरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायत माळेवाडी (अ) अकलूजच्या वतीने दिनांक 27/3/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात आला. प्रथम गावातून कोरोना जागृतीसाठी व तपासणी करून घेण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये 112 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. हा उत्स्फूर्त पणे राबवलेला कॅम्प होता. या कामी माळेवाडीचे सरपंच जालिंदर आप्पा फुले, उपसरपंच अरुण खंडागळे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच आरोग्य विभागाचे माळीनगर पी. एस. सी चे डॉक्टर जाधव व फुंदे, डॉक्टर देशमुख, सिस्टर हिरवे, आरोग्य सेवक तसेच अंगणवाडीच्या सर्व सेविका प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक सर्व आशा वर्कर ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी या सर्वांनी मिळून हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक विलास बाबर यांनी नियोजन केले व हा कॅम्प यशस्वी केला. त्याबद्दल सरपंच जालिंदर भाऊ फुले यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ग्रामपंचायत सदस्य नामदेव गलांडे यांनी कोरोना तपासणी टीमची भोजनाची सोय केली. सर्वांनी तपासणी करून घेऊया, लस घेऊन कोरोना आपल्या गावातून घालवूया असा संदेश या तपासणी कॅम्प मधून देण्यात आला.
0 Comments