बारामतीच्या करामती थांबणार कधी ?
बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊ शकते तर अकलूज नातेपुते का नाही?
अकलूज (कटूसत्य वृत्त):- बारामती तालुक्यातील माळेगाव (बुद्रुक) या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत होऊ शकते तर माळशिरस तालुक्यातील अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीचे का नाही? असा सवाल करीत सत्तेत सामावलेल्या बारामतीकरांच्या करामती थांबणार कधी? अशा संतप्त प्रतिक्रिया अकलूज व नातेपुते गावातून उमटत आहेत.
आज बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत मध्ये रूपांतर करण्याचे नोटिफेकश राज्य सरकारने काढले..
मात्र माळशिरस तालुक्यातील अंतिम टप्प्यात असलेल्या अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतरीत करण्याबाबत फायनल नोटिफेकश राज्य शासन का काढत नाही ? हा दुजाभाव का ?
नगरपालिका होण्यासाठी नातेपुते व अकलूजच्या जनतेने जीवाचे रान केले या दोन ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर शेवटच्या टप्प्यात आहे फक्त राज्य सरकार कडून नोटिफेकश काढने बाकी असताना माळशिरस तालुक्यातील जनते बाबत राज्य सरकारला एवढा आकस व टोकाचा द्वेष का वाटावा ?
महाविकास आघाडी सरकार कडून नातेपुते व अकलूजकरांच्या विकासाच्या मार्गात का अडथळा आणला जातोय? कशाची भीती वाटते सरकारला? या गावातील नागरिकांचा दोष काय? का राज्य सरकार नोटिफेकश काढत नाही?
राज्य सरकारने कोणताही दुजाभाव न करता सर्व समावेशक भुमिका घ्यावी माळशिरस तालुक्यातील अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये तात्काळ रूपांतर करावे.
धैर्यशील मोहीते पाटील.आशिया खंडातील अत्यंत बलवान असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्याबाबतची फाईल शासन दरबारी धूळखात पडून आहे.अकलूज व नातेपुते नगरपालिकेचा विषय अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीकडून भेदभावाची भूमिका बजावली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारकडे समानता, समदृष्टीपणा असणे गरजेचे आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज व नातेपुते ग्रामपंचायत नगरपालिकेच्या प्रकरणाबाबत महाविकास आघाडीची वक्रदृष्टी का? तर बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीकडे प्रेमळ दृष्टी का? हा भेदभावाचा दृष्टिकोन महाविकास आघाडीने बदलण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
0 Comments