पांचाळ कुटुंबीयांकडून महेश इंगळे यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

पांचाळ कुटुंबीयांकडून महेश इंगळे यांचा सत्कार

 पांचाळ कुटुंबीयांकडून महेश इंगळे यांचा सत्कार

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : कोल्हापूर येथील स्वामी भक्त तथा श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे संचालक वीरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी मित्रपरिवारासह सदिच्छा भेट दिली.

यावेळी वीरेश पांचाळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे आणि प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेही वीरेश पांचाळ व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन महेश इंगळे यांनी सत्कार केला.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले, विश्वस्त प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, प्रा. शिवशरण अचलेर, श्रीकांत झिपरे, अमर पाटील, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, सोमनाथ सुतार, खाजप्पा झंपले, मनोज इंगोले, मेजर अमोल माने, बाबा सुरवसे, रामलिंगय्या स्वामी, मधुकर सदाफुले, सुरेश वाले, अंकुश केत, नंदकुमार जगदाळे, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, तुषार मोरे, अमोल महाडिक, दर्शन घाडगे, प्रतीक इंगळे, आदित्य गवंडी आदींसह वीरेश पांचाळ व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages