कै. कल्याणराव इंगळे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

कै. कल्याणराव इंगळे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 कै. कल्याणराव इंगळे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

बुधवार, १८ मार्च रोजी मैंदर्गी रोडवरील समर्थ पार्क येथे कै. कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण, उद्यानातील महालक्ष्मी मंदिराचे सुशोभीकरण व पूजन तसेच अर्धपुतळ्याचे अनावरण व मालार्पण सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

यावेळी मुख्य पुरोहित प.पू. मोहनराव पुजारी यांच्यासह विविध मठांचे स्वामी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, पै. अनिकेत घुले, माजी सभापती संपतराव शिंदे, सुनील फडतरे, गणेश करे-पाटील, जयेश नाईक, डॉ. विलास मोरे, डॉ. विजय माटे आदींची उपस्थिती राहणार आहे.

तसेच, या निमित्ताने कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन व श्री स्वामी समर्थ रुग्णालय येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, अॅक्युप्रेशर शिबीर, रक्तदान शिबीर, इंग्रजी कार्यशाळा तसेच गुणीजन पुरस्कार वितरणाचा समावेश आहे.

डॉ. स्वप्निल हिप्परगी, डॉ. रोहित कुंभार, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्वप्ना हिप्परगी, डॉ. राजेश मलंग व दंतरोग तज्ञ डॉ. नम्रता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वरोग निदान शिबीर होणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages