डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 5, 2021

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर संपन्न

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर संपन्न 

अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- नातेपुते येथील महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय  सेवा योजना विभाग आणि सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लड सेंटर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            संपूर्ण जगामध्ये कोरोना १९ या महाभयंकर  विषाणूने थैमान घातले आहे. या गंभीर परिस्थितीत रुग्णांना रक्ताची गरज आहे. ती गरज ओळखून युवकांचे प्रेरणास्थान डॉ. धवलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे कला, वाणिज्य, विज्ञान विभागातील अजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी, प्राध्यापक असे एकूण यांनी ५१ रक्तदात्यानी रक्तदान करून डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना शुभेछा दिल्या. ज्ञानेश्वर बोराटे, प्रा. पंकज कोडलकर, डॉ. बाळासाहेब निकम, प्रा. संभाजी बनसोडे, प्रा.डॉ राजेंद्र खंदारे आदींनी प्रत्यक्ष रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. सदर रक्तदान शिबीराचे संयोजन  प्रकल्प अधिकारी , प्रा.दत्तात्रय थोरात, प्रा.श्रीकांत पवार, प्रा. सौ. सुनिता सूर्यवंशी प्रा.जगदीशचंद्र मुळीक  प्रा.डॉ.बाळासाहेब निकम,  प्रा डॉ राजेंद्र खंदारे यांनी केले. तर  शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रा. सोपान सुरवसे, प्रा.सुहास नलवडे, प्रा.मोहन सावंत, प्रा. सौ. विद्या बनसोडे, प्रा. रमेश पाटील, प्रा.उत्तम सावंत, प्रा.अजित भोपळे, प्रा.नितीन देशपांडे, प्रा. रज्जाक शेख, प्रा.दत्तात्रय साळवे, प्रा.डॉ.दत्तात्रय शहाणे प्रा. मेनकुदळे आणि ब्लड बँकेचे डॉ.खडतरे, ब्लड बँक कर्मचारी वर्ग, जनसेवा संघटनेचे प्रसिध्दीप्रमुख मयूर माने या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.शिबिराच्या शेवटी रक्तदात्यांना जनसेवा संघटनेच्या वतीने कोरोना १९ युद्घा सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages