पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 5, 2021

पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 पंढरपूर तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 190 नागरिकांकडून 19 हजार रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर (कटुसत्य वृत्त ) :- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या         दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात   आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 190 नागरिकांकडून  19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी  तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय कामाकाजासाठी तहसिल कार्यालय, पंचायत समितीमध्ये येतात. गर्दीमुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी  नायब तहसिलदार मनोज श्रोत्री व  पंडीत कोळी यांनी पथक तयार करुन विना मास्क तहसिल कार्यालय आवारात  फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. संबधित नागरिकांकडून दिनांक 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत 9 हजार रुपये दंड वसून करण्यात आला. ग्रामीण भागात विना मास्क  फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन  5 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच भंडीशेगांव, उपरी व गादेगांव या ठिकाणी तहसिलदार सुशिल बेल्हेकर व गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी अचानक भेट देवून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 5 हजार रुपयांचा दंड वसून केला. असा एकूण 19  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले. 

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विना कारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच कोरोनाबाबत प्रशासनाने वेळोवळी दिले सूचनांचेही पालन करावे अन्यथा साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages