Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे विभागातील 5 लाख 92 हजार 666 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 23 हजार 300 रुग्ण

 पुणे विभागातील 5 लाख 92 हजार 666 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 23 हजार 300 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
 

  पुणे (कटुसत्य वृत्त ) :- पुणे विभागातील 5 लाख 92 हजार 666 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 23 हजार 300 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 255 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.09 टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4 लाख 11 हजार 843 रुग्णांपैकी  3 लाख 91 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11  हजार 423 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.23 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.00 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 59 हजार 107 रुग्णांपैकी 55 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 361 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  53  हजार 224 रुग्णांपैकी 50 हजार 460 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 917 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 847  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 48  हजार 573 रुग्णांपैकी 46 हजार 625 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 187 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  50 हजार 553  रुग्णांपैकी 48  हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  367 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 32 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 714सातारा जिल्ह्यात 131, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात  35 तर  कोल्हापूर जिल्ह्यात 48 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ  झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या  रुग्णांमध्ये  एकूण  935 आहे. पुणे जिल्हयामध्ये 774 , सातारा जिल्हयामध्ये 55, सोलापूर जिल्हयामध्ये 63, सांगली जिल्हयामध्ये 31  व कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 41 लाख  16 हजार 674 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  6 लाख  23  हजार 300 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments