पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य

 पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेनंतर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदार ओळखपत्र नसेल तर 11 कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तर मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


       मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हा प्रमुख दस्तऐवज पुरावा म्हणून लागतो. मतदार ओळखपत्र नसेल तर खालीलप्रमाणे एका पुराव्याच्या आधारे मतदान करता येणार आहे.


          पारपत्र (पासपोर्ट)वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्सकेंद्र/राज्य/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक पब्लिक सेक्टर कंपनीपब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबूकपॅनकार्डस्मार्ट कार्डएनपीआरच्या अंतर्गत आरजीआईद्वारे प्रस्तूत केलेले मनरेगा जॉब कार्डकामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ विम्याच्या उद्देशाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रेनिवडणूक यंत्रणेद्वारे जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी (फोटो व्होटर स्लिप)लोकसभा / विधानसभा / राज्यसभा/विधानपरिषद सदस्य यांच्याकडून देण्यात आलेले शासकीय ओळखपत्र आणि आधारकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र असेल तर मतदारांना मतदान करता येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages