पुरवठा विभागातर्फे जागतिक ग्राहक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे कार्यक्रम करण्यात आला. ग्राहकांचे हक्क आणि चळवळीचे महत्व, ग्राहकांनी आपल्या वस्तूंच्या खरेदीबाबत जागरूकतता बाळगणे महत्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके, ज्येष्ठ पत्रकार आनंद सागर, दीपक इरकल आदी उपस्थित होते. पुरवठा निरीक्षण अधिकारी शरद लोखंडे, अव्वल कारकून हेमंत फुलारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 Comments