Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान


लऊळ (कटूसत्य वृत्त) :- व्होळे ता.माढा येथे औदुंबर पाटील युवा मंच व अतुल कासविद मित्रपरिवार  तसेच सर्व होळे ग्रामस्थ यांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या माढा तालुकाध्यक्षपदी संभाजी पाटील,कार्याध्यक्षपदी रामराजे नलवडे, टेंभुर्णी शहराध्यक्षपदी मयूर काळे तसेच  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी सर्वेश देवकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याबरोबरच नगोर्ली गावचे युवा नेते राम नवले, लऊळ गावचे नूतन सरपंच प्रतिनिधी प्रशांत बोडके, नूतन ग्रामपंचायत सदस्य महेश बागल, सतीश मांदे, कल्याण गाडे, स्वप्नील पाटील, आलम शेख, पै.रोहन साळुंके, तुषार कासविद आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भीमराव वजाळे युवा मंचचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments