पुणे विभागातील 6 लाख 27 हजार 302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी , विभागात कोरोना बाधित 6 लाख 89 हजार 315 रुग्ण
पुणे (कटूसत्य वृत्त) :- पुणे विभागातील 6 लाख 27 हजार 302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 89 हजार 315 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 45 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 784 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.00 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 69 हजार 478 रुग्णांपैकी 4 लाख 20 हजार 966 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 39 हजार 35 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.02 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.67 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 62 हजार 292 रुग्णांपैकी 58 हजार 189 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 223 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 632 रुग्णांपैकी 52 हजार 71 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 626 रुग्णांपैकी 47 हजार 59 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 794 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 287 रुग्णांपैकी 49 हजार 17 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 514 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 257 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 408, सातारा जिल्ह्यात 327, सोलापूर जिल्ह्यात 371, सांगली जिल्ह्यात 71 तर कोल्हापूर जिल्ह्यात 80 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 782 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 531, सातारा जिल्हयामध्ये 25, सोलापूर जिल्हयामध्ये 152, सांगली जिल्हयामध्ये 42 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 32 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 45 लाख 41 हजार 820 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 89 हजार 315 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
0 Comments