राज्यात गैरप्रकार केलेल्या 347 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

राज्यात गैरप्रकार केलेल्या 347 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द

 राज्यात गैरप्रकार केलेल्या 347 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द  - अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम


 मुंबई (कटुसत्य वृत्त ) :- गैरप्रकारात दोषी आढळलेल्या राज्यातील 347 रास्त भाव (रेशन) दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेतअशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधानसभेत दिली.

            मौ. अकोली जहागीर (ता. अकोटजि. अकोला) येथील एका रास्त भाव दुकानाच्या अनुषंगाने सदस्य श्री. रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देताना श्री. कदम बोलत होते.

            यावेळी श्री. कदम यांनी माहिती दिली कीमौ. अकोली जहागीर येथील रास्त भाव दुकानातून अवैध धान्यसाठा आढळून आल्यामुळे कारवाई करुन तो जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाब न्याय प्रविष्ट आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात येईल. गैरव्यवहार केल्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दुकानांवर प्रथम परवाने निलंबित करण्याची आणि नंतर कायमचे रद्द करण्याची कारवाई केली जातेअशी माहितीदेखील श्री. कदम यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages