‘लोकराज्य’चा महिला विशेषांक प्रकाशित
मुंबई (कटुसत्य वृत्त ) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा मार्च महिन्याचा महिला विशेषांक प्रकाशित झाला आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या अंकात विविध कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देणाऱ्या यशकथा, योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील आणि भारतातील महिलांच्या चळवळींच्या संदर्भात काही आत्मचिंतन व त्याचे शाश्वत विकासाशी काय नाते आहे याचा ऊहापोह करणारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महिलांसाठी राज्यशासन राबवत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर व राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतातून दिली आहे. त्याचबरोबर राज्याच्या विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधींची ओळख, विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिला, कोरोना काळात यशस्वी लढा देणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या यशकथांचा तसेच मंत्रिमंडळ निर्णयांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे.
0 Comments