अवैध वाळू प्रकरणी दसुर येथील पोलीस पाटलावर कारवाई...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई
अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील दसुर येथील पोलीस पाटील अवैध वाळू धंदा करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडून वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,
महेश अशोक शिंदे, वय 37, रा. दसुर (पोलीस पाटील ) हा वाळूचा अवैध धंदा करीत होता. दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दसुर परीसरात या वरती कारवाई केली असून पोलीस पाटील शिंदे सह त्याचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे, रा. खळवे यांचेवर वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर कारवाई मध्ये 12 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 2 लाख रुपयांची डम्पिंग ट्रॉली, 10 लाख रुपयांचा महिंद्रा ट्रॅक्टर तर 7 हजार रुपयांची वाळू सोबत 25 हजार रुपयांची मोटारसायकल (mh45b9719) असा मुद्देमाल आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षका तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, श पो उ नि खाजा मुजावर, पोहेकॉ नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे करीत आहेत.सदर अशा प्रकारचा गुन्हा पोलीस पाटलांनी केल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच पोलीस पाटलाला निलंबित करण्याची ग्रामस्थांकडून होत आहे.
0 Comments