सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न

 सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न

अकलूज  (कटुसत्य वृत्त ) :-  सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ०८/०३/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न झाला . सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून स्वरूपाराणी माहिते - पाटील लाभल्या, तसेच प्रमुख पाहूण्या म्हणून ब्रम्हकुमारी राजयोगीनी सोमप्रभा बहनजी लाभल्या, त्याचबारोबर ब्रम्हकुमारी शिवरात्री बहनजी तसेच सोलापूर जिल्हयातील विविध ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयांच्या सेवाकेंद्रावरील संचालिका त्याचबरोबर महिला तक्रार निवारण समिती सदस्या डॉ . श्रद्धा जवंजाळ या सर्व उपस्थित असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . इंद्रजीत यादव यांनी दिली. दिदिसाहेबांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणामध्ये जगाच्या कानाकोप - यामध्ये सगळीकडेच महिलांच्या समस्या आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे . तसेच सर्वांनी शिक्षणाबरोबर मानसीक आरोग्य जपणे देखील आवश्यक असल्याचे सांगीतले . तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या ब्रम्हकुमारी राजयोगीनी सोमप्रभा बहनजी यांनी त्याच्या आर्शिवचनामध्ये महिला सशक्तीकरण होणे गरजेचे आहे व त्यासाठी पुरूषानी सहयोगी बनून महिलांची साथ दिली पाहिजे  तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बोलत असताना त्यांनी सांगीतले की जसे शारीरीक प्रतीकारशक्ती गरजेची आहे तसेच आत्मीक प्रतीकारशक्तीदेखील वाढविणे गरजेचे आहे . सदर कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते - पाटील , सचिव राजेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले . त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . इंद्रजित यादव यांनी धाडसी वृत्ती व उर्जा या गोष्टी जिवणाला दिशा देतात त्यामुळे त्या गोष्टी महिलांनी अंगीकाराव्यात असे सांगीतले . तसेच महाविद्यालयामध्ये दरवर्षी महिला दिन उत्साहात साजरा करण्याचे आश्वासन देवून सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा . सागर फुले , सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु . आरती भातलवंडे व कु . आरती सुरवसे या विद्यार्थीनींनी केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages