Hot Posts

6/recent/ticker-posts

जगातील पहिल्या " मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म " वेबसेरिजची पुण्यात निर्मिती : अमित बाईचे

 जगातील पहिल्या " मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म " वेबसेरिजची पुण्यात निर्मिती : अमित बाईचे 


अकलूज (कटुसत्य वृत्त ) :-  कोरोना लॉकडाउनच्या काळात प्रत्येकाच्या गरजा बदलल्या , प्रत्येकाची जगण्याची स्टाइल बदलली . अनेकांना आपली हक्काची नोकरी गमवावी लागली आणि ही नोकरी गेल्याने जीवन पध्दती कशी बदलत गेली , कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले याचे उत्कृष्ट चित्रीकरण असलेली " जॉबलेस " ही जगातील पहिली " मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म " वेबसेरिज प्लॅनेट मराठी या सिरीजवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती या सिरीजचे लेखक अमित बाईचे यांनी दिली . 
बाईचे म्हणाले , आपली नोकरी गेल्यानंतर कोणकोणत्या अडीचणींचा तरुणांना सामना करावा लागतो , चुकीच्या निर्णयामुळे मानसिक , आर्थिक संतुलन कसे बिघडत जाते याचे उत्कृष्ट चित्रण  या सिरीज मध्ये करण्यात आले आहे . सात भागात ही सिरीज प्रदर्शित केली जाणार आहे . या सस्पेंस सिरीजचे सर्व चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे . 
या चित्रपटाचे दिग्दर्शक निरंजन पत्की तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून योगिराज भिसे यांनी काम पाहिले आहे . हरीश दुधाडे , अमित बाइचे , पिनक बडवे , श्रीपाद दिक्षीत व क्षितिज कुलकर्णी हे या सिरीजचे निर्माते आहेत . सुनील खरे यांनी चित्रीकरण केले आहे . पुण्याच्या इमोट आयकॉंस प्रॉडक्शन्स प्रा . लि . या प्रॉडक्शन हाउस मध्ये या सिरीजचे चित्रीकरण होत आहे . 
या सिरीजमध्ये सौरत , मयुरी वाघ , स्वप्नील पाटील , राधा धरने , हरीश दुधाडे , सिध्देश्वर झाडबुके , मयूर पवार आणि पुष्कर क्षोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत .

Reactions

Post a Comment

0 Comments