राष्ट्रवादीकडून तब्बल 53 उमेदवारांनी केली उमेदवारीची मागणी
सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी बहुमतापर्यंत जाणार , तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांचा विश्वास

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ नगरपरिषदेसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे आणि राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजासुतार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना या उमेदवारांच्या संख्येबद्दल आणि प्रभागनिहाय नावाबद्दलची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रकाश चवरे म्हणाले की मोहोळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वाधिक विकास कामे यशस्वीपणे पूर्ण करणारा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सर्व स्तरातील उमेदवारांनी राष्ट्रवादीला सर्वाधिक पसंती दिली आहे .मोहोळ नगर परिषदेच्या 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची सर्व नावे ही मुंबईचे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक नरेंद्र घुले यांना पाठवण्यात येणार असून त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या सतरा प्रभागातून तब्बल ५३ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत पाच मार्चपर्यंत होती. पक्षाकडे रीतसर मागणी केलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी मिळणार आहे. यानंतर मागणी केलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी बाबतचे अधिकार हे पक्ष स्तरावर असणार आहेत. पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्यांवर निश्चितपणे पक्षस्तरावरून कारवाई होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजा सुतार म्हणाले की राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आ. यशवंत तात्या माने यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी तब्बल दहा कोटींचा विकास निधी खेचून आणला आहे. त्यामधून शहराच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण होताना जाणवत आहे. यापुढील काळातही मोहोळ नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला नाही जाणार नाही असा शब्द आ. यशवंत माने यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वाधिक जागा जिंकून बहुमतापर्यंत जाणारा पक्ष असेल असा दावा देखील यावेळी राजा सुतार यांनी केला.
प्रभाग निहाय अर्ज संख्या पुढीलप्रमाणे
प्रभाग १- २
प्रभाग २- २
प्रभाग ३- ३
प्रभाग ४- ४
प्रभाग ५- २
प्रभाग ६- २
प्रभाग ७- ५
प्रभाग ८- ३
प्रभाग ९- १
प्रभाग १०- ६
प्रभाग ११- २
प्रभाग १२- ६
प्रभाग १३-३
प्रभाग १४-३
प्रभाग १५ - ३
प्रभाग १६-३
प्रभाग १७-३
प्रभाग क्रमांक 1 मधून
मेघा संतोष भोसले
शाहीन नबीलाल इनामदार
प्रभाग क्रमांक 2 मधून
नाजनीन एजाज तलफदार
राणी रुपेश धोत्रे
प्रभाग क्रमांक 3 मधून
शरयू आनंद गावडे
सुषमा मंगेश पांढरे
पल्लवी चिंतामणी देशमुख
प्रभाग क्रमांक 4 मधून
नुरजहा नसरुद्दीन मोमीन
दिपाली बाळासाहेब गवळी
दिलशाद जब्बार शेख
लक्ष्मी राहुल तावसकर
प्रभाग क्रमांक 5 मधून
लक्ष्मी संतोष खंदारे
रेखा विजय अष्टूळ
प्रभाग 6 मधून
विमल मनोहर खवळे
मनीषा दिलीप जाधव
प्रभाग 7 मधून स्मिता प्रकाश कोकणे
यशोदा दिलीप कांबळे
प्राची संदीप सोनवणे
शोभा नागनाथ सोनवणे
प्रज्ञा सचिन आष्टूळ
प्रभाग क्रमांक 8 मधून
संतोष जनार्दन सुरवसे
मुस्ताक अहमद खाजुलाल शेख
चंद्रकांत भगवान वाघमोडे
प्रभाग क्रमांक 9 मधून
रोहित तथा अण्णा अनिल फडतरे
प्रभाग क्रमांक 10 मधून
अंजली अशोक मांडवे
प्रीती हेमंत गरुड
सुप्रिया नागेश पुराणिक
कीर्तीबाला ब्रह्मदेव भोसले
छाया मधुकर शिंदे
वंदना दीपक इंगळे
प्रभाग 11 मधून
नेताजी मोतिराम जाधव सुदर्शन सुभाष गायकवाड
प्रभाग 12 मधून सुदर्शन कळसे
गोरख गोडसे जिब्राईल शेख सूर्यकांत कांबळे गणेश धोटे मुस्ताक अहमद शेख
प्रभात 13 मधून प्रशांत पाचकुडवे साक्षी रोहित फडतरे योगेश ओहोळ
प्रभाग 14 मधून लखन कोळी प्रमोद डोके प्रकाश आठवले
प्रभाग 15 मधून संतोष वायचळ
समीर नाईकवाडी
मुस्ताक अहमद शेख
प्रभाग क्रमांक 16
अर्चना विजय वाघमोडे
अनिता संजयकुमार सुळे
कल्पना शिवानंद स्वामी
प्रभाग क्रमांक 17
सुरेश गाढवे
तानाजी माने
संजयकुमार सुळे
0 Comments