संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने नॉन-क्रिमीलेयर दाखला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने नॉन-क्रिमीलेयर दाखला

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या
इतर मागासवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने नॉन-क्रिमीलेयर दाखला
- संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब

मुंबई  (कटुसत्य वृत्त ) :- संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांसाठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा (नॉन- क्रिमिलेयर) दाखला प्राधान्यक्रमाने उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतीलअसे संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले.

            सदस्य श्री. नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही माहिती सभागृहात दिली.        

            दि. 24 मार्च ही युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना या मुदतीत नॉन- क्रिमिलेयर प्रमाणपत्रे अपलोड करण्यासाठी उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहेअसे यावेळी श्री. पटोले यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत भाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages