शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 30 मार्च पर्यंत मुदतवाढ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 22, 2021

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 30 मार्च पर्यंत मुदतवाढ

 शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 30 मार्च पर्यंत

 मुदतवाढ


पुणे ( कटुसत्य वृत्त ) :-  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

 (इ.8 वी) दि.25 एप्रिल, 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या

 परीक्षेची अधिसूचना दिनांक 9 मार्च 2021 रोजी परीक्षा

 परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली

 आहे.

               या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दि.9 मार्च ते 21 मार्च, 2021 या कालावधीत मुदत

 देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दिनांक 30

 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली  असल्याचे पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे

 यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages