Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे विभागातील 6 लाख 24 हजार 520 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी , विभागात कोरोना बाधित 6 लाख 83 हजार 58 रुग्ण

 पुणे विभागातील 6 लाख 24 हजार 520 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी , विभागात कोरोना बाधित 6 लाख 83 हजार 58 रुग्ण


 पुणे ( कटुसत्य वृत्त ) :- पुणे विभागातील 6 लाख 24 हजार 520 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 83 हजार 58 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 794 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.45 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.43 टक्के आहे.


पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4 लाख 64 हजार 70 रुग्णांपैकी 4 लाख 18 हजार 435 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 36 हजार 190 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.04 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  90.17 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 965 रुग्णांपैकी 58 हजार 164 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  56  हजार 261 रुग्णांपैकी 51 हजार 919 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 450 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 892  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49  हजार 555 रुग्णांपैकी 47 हजार 17 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 766 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  51 हजार 207  रुग्णांपैकी 48  हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  466 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 101 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 574सातारा जिल्ह्यात 141सोलापूर जिल्ह्यात 256सांगली जिल्ह्यात  87 तर  कोल्हापूर जिल्ह्यात 43 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ  झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या  रुग्णांमध्ये  एकूण  2 हजार 639 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 138सातारा जिल्हयामध्ये 387सोलापूर जिल्हयामध्ये 52सांगली जिल्हयामध्ये 38 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 24 रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण

        आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 लाख 10 हजार 732 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  6 लाख  83  हजार 58 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments