Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे स्व.दादा कोंडके फॅन क्लबतर्फे कविसंमेलन

 अकलूज येथे स्व.दादा कोंडके फॅन क्लबतर्फे कविसंमेलन

अकलूज ( कटुसत्य वृत्त ) :-  अकलूज देशमुख मळा येथील स्व. दादा कोंडके फॅन क्लबच्या वतीने स्व. दादा कोंडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. फॅन क्लबचे संस्थापक अध्यक्ष कांतिलाल नाना एकतपुरे यांच्या निवासस्थानी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन निवडक रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अकलूजमधील ज्येष्ठ कलाकार प्रेमसागरदादा पुंज व नारायणकर सर यांच्या शुभहस्ते स्व.दादा कोंडकेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये कांतीलाल एकतपुरे यांनी कार्यक्रमामागील भूमिका व दादा कोंडकेंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रेमसागर पुंज व नारायणकर सर यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले केले. त्यानंतर कविसंमेलनाला प्रारंभ झाला. वीरेंद्र पतकी यांच्या जीवनातील तोचतोचपणा अधोरेखित करणाऱ्या कवितेने संमेलनाला आरंभ झाला. जयंत बोबडे यांनी गेय कविता सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. रियाज चौधरी यांच्या कवितेतील विफल प्रेमाने रसिकांची मने हेलावून गेली. पांडुरंग नलवडे यांनी नाची ही लक्षवेधी कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. समाधान देशमुख यांनी आपल्या कवितेमधून वृध्दांच्या वेदनेकडे लक्ष वेधून घेतले. शब्बीर शेख यांच्या विनोदी कवितांनी उपस्थितांमध्ये खसखस पिकली. प्रेमनाथ रामदासी यांनी आपल्या स्मार्टकार्ड नावाच्या कवितेमधून टीव्हीचे वाढले प्रस्थ आणि त्याच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. सुहास उरवणे यांच्या कवितेनेही रसिकांना अंतर्मुख बनवले. यावेळी प्रथमेश उरवणे या युवा कविनेही आपली सुरेख अशी कविता सादर केली. चंद्रलेखा देशमुख हीने आपले मनोगत व्यक्त केले. प्रगती पाटील यांच्या ऑनलाईन कवितांचेही वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी भक्ती टायपिंगचे गजानन जवंजाळ, रामचंद्र चौधरी, महादेव राजगुरु, मेहश सुर्यवंशी, नामदेव तरंगे, आनंद अवताडे, नितीन बनकर, पाटीलसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन एकतपुरे, देविदास एकतपुरे, कुणाल एकतपुरे, अमित पुंज, नितीन गेजगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे देखणे सूत्रसंचालन प्रेमनाथ रामदासी यांनी केले तर आभार कांतीलाल एकतपुरे यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments