महावितरण कार्यालयालयाला काळं फासलयं,भविष्यात अधिका-यांच्या तोंडाला काळं फासणार - अतुल खुपसे पाटिल
टेंभुर्णी ( कटुसत्य वृत्त ) :- टेंभुर्णी महावितरण कार्यालय येथे शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांनी महावितरणला काळे फासुन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तिव्र निषेध आज सकाळी साडेअकरा वाजता टेंभुर्णी येथील महावितरण कार्यालयावर नोंदविला आहे.
उर्जामंत्री राऊत यांनी अधिवेशन संपताच वीज बील तोडणीवरील स्थगिती उठवली आहे.सध्या या परस्थीतीमध्ये कोरोना प्रादुर्भावमुळे शेतकरी हैरान झाले आहेत.शासनाने वीज तोडणी तात्काळ थांबवावे,या मागण्यांसाठी टेंभुर्णी महावितरण येथे खुपसे पाटील यांनी तीव्र भूमिका घेत महावितरणला काळे फासले.यावेळी पिण्याच्या पिण्यासाठी एक तासाऐवजी वीज दोन तास चालू ठेवु, शेवटच्या एक महिन्याचे बील डीपी वरील एका जरी शेतक-याने भरले तरी डीपी चालू करू, अशी लवचिक भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी करमाळा येथे झालेल्या स्फोटक अंदोलनामुळे टेंभूर्णी येथे वीस पोलिस, दोन पोलिस उपनिरीक्षक, असा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी निवेदन महावितरणचे उपअभियंता जाधव यांनी स्विकारले. त्यावेळस खुपसे-पाटील म्हणाले आता फक्त फलक काळा केला आहे भविष्यात महावितरणच्या अधिका-यांची तोंडे काळं करू असा इशारा दिला.यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली API भोसले,API शितोळे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.यावेळी रमेश पाटील,राणा वाघमारे प्रशांत खुळे,केशवराव लोखंडे,रमेश पाटील,शरद सपाटे,किर ण भांगे,बालाजी सपाटे, हरी सपाटे, आण्णा मस्के, गणेश ढोबळे, बापू मोहिते, बंडू गोरे,आदी उपस्थित होते.
0 Comments