Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी आ. राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मोहोळ शहराला आणखी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 माजी आ. राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मोहोळ शहराला आणखी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रवादी युवा नेते संतोष सुरवसे आणि रोहित अण्णा फडतरे यांची माहिती

                             


                                                                               

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :-  मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरूवातीपासूनच मोहोळ शहराचे विकास  मार्गदर्शक तथा माजी आ. राजन पाटील हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आ. यशवंत माने यांनी देखील तालुक्याचे शहर असलेल्या मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी एकच दक्ष लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत पोटतिडकीने कर्तव्यदक्षता बजावत ठोस पावले उचलली आहेत.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या विशेष सहकार्यामुळे माजी आ. राजन पाटील आणि आ. यशवंत तात्या माने यांनी अथक पाठपुरावा करून आपल्या मोहोळ शहरासाठी शासनाच्या विविध योजनेतून तब्बल 22 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे अशी माहिती मोहोळचे राष्ट्रवादीचे युवा नेते संतोष  सुरवसे आणि रोहीत फडतरे यांनी दैनिक कटूसत्यशी बोलताना दिली.
                मोहोळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादीच्या सत्ता कालावधीत आम्ही सर्व नगरसेवकांनी विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांचा जणु डोंगर उभा केला आहे. मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आ.  राजन पाटील आणि आ. यशवंत  माने यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याची कृतज्ञताही यावेळी सुरवसे यांनी व्यक्त केली. यापूर्वी देखील आ. यशवंत तात्या माने यांनी मोहोळ नगरपरिषदेसाठी अजित पवारांकडे पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी खेचून आणला होता. त्यामधून सध्या अनेक प्रभागात रस्ते पाणी आरोग्य विषयक सुविधांची कामे मार्गी लागत आहेत.
               आतादेखील तब्बल 22 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करून आणल्यामुळे मोहोळ शहरांमध्ये राष्ट्रवादी हा सर्वाधिक विकासकामे पुर्ण करणारा पक्ष ठरला आहे असेही यावेळी सुरवसे म्हणाले. आ. यशवंत माने यांनी मोहोळ शहरामध्ये असलेल्या पोलीस बांधवांच्या वसाहतीसाठी सात कोटी रुपयांचा निधी शासकीय विश्रामगृहासाठी तब्बल 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या पुढील काळात आवश्यक असणाऱ्या शहराच्या विकास कामांसाठी तब्बल चौदा कोटी 50 लाख रुपयांचा निधी राज्याच्या नगरविकास प्रशासनाकडे पाठपुरावा करून खेचून आणला आहे असेही सुरवसे यावेळी म्हणाले.
         यापूर्वी प्रथम महीला नगराध्यक्ष सरिता सुरवसे आणि उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांच्या कालावधीतही विक्रमीनिधीतून विकास कामे पूर्ण झाली. सध्या देखील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक नगराध्यक्ष शाहीन शेख आणि उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांना बहुमोल सहकार्य करत मोहोळ शहराच्या विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करत आहेत.दर्जेदार विकासकामे केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये विकासाबद्दल एक आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत नक्कीच मोहोळ शहरातील सुजाण मतदार बांधव राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक पसंती देतील अशी खात्री यावेळी सुरवसे यांनी व्यक्त केली.
               यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित फडतरे, नगराध्यक्ष शाहीन शेख, उपनगराध्यक्ष तथा गटनेते प्रमोद डोके, माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी नगराध्यक्ष शौकत
तलफदार, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाअध्यक्ष राजा सुतार, नगरसेविका मनीषा फडतरे, नगरसेवक संतोष खंदारे, नगरसेवक दत्तात्रय खवळे, नगरसेविका अर्चना वायचळ, नगरसेवक मुस्ताकअहमद शेख, नगरसेविका सुवर्णा गाढवे, नगरसेवक अतुल गावडे, राष्ट्रवादी संघटक सुरेश कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी अध्यक्षा यशोदा कांबळे, युवा नेते दौलतराव तथा बंडू देशमुख, उद्योजक जयवंत गुंड, बापूसाहेब आठवले इत्यादी उपस्थित होते.
            गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ शहराच्या सर्वांगीण हितासाठी माजी आ. राजन पाटील यांनी सातत्याने अत्यंत सकारात्मक भावनेने प्रयत्न केले आहेत. मोहोळ ग्रामपंचायतीच्या कालावधीपासून ते आज नगरपरिषद पाच वर्षाच्या कालावधीत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीमध्ये माजी आ. राजन पाटील आणि पाटील परिवाराचे योगदान निश्‍चितपणे मोठे आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच्या रोमहर्षक विजयानंतर आमदारकीची धुरा स्वीकारल्यापासून दक्ष आ. यशवंततात्या माने यांनी मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मोहोळ शहराच्या अनेक वर्षापासूनचे विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे मोहोळ शहराच्या यापुढील काळातील विकासाची धुरा देखील शहरातील मतदार विकासाभिमुख पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीकडेच ठेवतील असा आम्हाला विश्वास वाटतो
संतोष सुरवसे
राष्ट्रवादी युवा नेते

Reactions

Post a Comment

0 Comments