थकबाकीदारांच्या वीज तोडणे बाबतचा फेरविचार राज्य सरकारने करावा- रोहन सुरवसे पाटील
स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने निवेनाद्वारे मागणी
अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- थकबाकीदारांच् या वीज तोडणी बाबतचा फेरविचार राज्य सरकारने करावा अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी मेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात चर्चा होई पर्यंत थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणे जोडणे थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची घोषणा २ मार्चला विधिमंडळात केली होती. मात्र वीज तोडणीला देण्यात आलेली ही स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठवण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली असून, थकबाकीदारांच्या परिस्थितीचा त्यांच्या हालाखीचा विचार करून वीज तोडणी बाबतचा राज्य सरकारने फेरविचार करावा.
कोविड महामारीमुळे गेल्या वर्षभरात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांचे संसार वार्यावर आलेत. घरातील कर्ती माणसं कोविडणे संपवले आहेत. ज्यांची हातावरची पोटे होती त्यांच्या हाताला लॉकडाऊन मध्ये कामे नव्हती. घरात बसून ते उपाशीपोटी कोरोनाशी लढत होते. लॉकडाऊनच्या काळात कोरोना पेक्षा भूक बळीचे अधिक शिकार झाले आहेत. काम बंद ! येणारा दाम बंद, घराबाहेर स्मशान शांतता पसरली होती. अशा परिस्थितीतून गोर-गरीब वाचलेत! अशा परिस्थितीमध्ये वीज बिल भरणार कसे? आपले सरकार या महामारीत आपले वीज बिल माफ करतील या आशेने गोरगरीब चिंतेत होते. परंतु सरकारने त्यांची अधिकच चिंता वाढवली आहे.यामध्ये गोरगरीब भरडले जाणार आहेत.तरी माननीय महोदय साहेब गोरगरिबांच्या परिस्थितीचा त्यांच्या हलाखीचा विचार करून वीज तोडणी बाबतचा राज्य सरकारने फेरविचार करावा अन्यथा स्वाभिमानी ब्रिगेड संघटना राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे नमूद केले आहे.
0 Comments