सोलापूर जिल्हा परिषदेतील सहा. गट विकास अधिकारी पदी पदोन्नत कर्मचाऱ्यांचा सन्मान.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील पुणे विभागातून ग्रामविकास विभागाने 30 वर्ग 3 कर्मचाऱ्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आले .त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील चार विस्तार अधिकारी पंचायत व एक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गातून साह्य गट विकास अधिकारी पदोन्नती मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते अरुण वाघमोडे गटविकास अधिकारी नरेगा जिल्हा परिषद सोलापूर, डॉ. दीपक साळुंखे सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी, विजयकुमार देशमुख साह्य गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ,बाबासाहेब पाटील सह्या गटविकास अधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर , वसंत फुले सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांचा शाल, रोप, फेटा बांधून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस .पी .माने, अध्यक्ष तजमुल मुतवली,सचिव विलास मसलकर, शशी नडगिरे, श्रीशैल देशमुख श्रीशैल देशमुख संदीप कोळी ,विशाल घोगरे ,संतोष शिंदे , तात्या रणदिवे,रोहित शिंदे, आदी उपस्थित होते.
0 Comments