कॅरेट मशीन असलेले पूर्व भागातील एकमेव शोरूम शुद्धता, पारदर्शकता, विश्र्वास असलेले दालन - भोसले
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- महिला दिनाचे औचित्य साधून महिला सप्ताह साजरा करीत असताना, महिलांना शुद्ध सोने मिळावे व त्याचे कॅरेट व्यवस्थित मिळावे म्हणून, कॅरेट मशीन जयलक्ष्मी ज्वेलर्सने उपलब्ध करून दिले असल्याचे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे डी. जी. एम. सुनिता भोसले यांनी व्यक्त केले.
अशोक चौक येथील सुप्रसिद्ध जयलक्ष्मी ज्वेलर्सच्या महिला सप्ताह सांगता समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जनकल्याण बँकेच्या संचालिका आशा हजारे, आदर्श शिक्षिका निर्मला मुशन, तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्ष माधुरी डहाळे , तसेच स्टाटेजिक कन्सल्टन्सीच्या प्रमुख निता जुमरानी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. पुढे बोलताना भोसले म्हणाल्या की जयलक्ष्मी ज्वेलर्स गेली 28 वर्षे ग्राहक सेवा यशस्वीपणे देत आहेत. सचोटी आणि विश्वास याचा मेळ घालून ते व्यवसाय करीत आहेत. कॅरेट मशीन, सचोटी आणि विश्वासामुळेच ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना जयलक्ष्मी ज्वेलर्सचे मालक वेंकटेश बिटला यांनी केले तर आभार श्वेता गेन्ने यांनी मानले.तर सूत्रसंचालन अंजली आठवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक बिटला, अमर बिटला, विवेक बिटला यांच्यसह सर्व स्टाफनी सहकार्य केले. या कर्यक्रमास महीला ग्राहक , व्यापारी बंधूं, तसेच मित्र परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments