Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 15 च्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू

 प्रभाग 15 च्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू

युवा उद्योजक समीर नाईकवाडी यांच्या संभाव्य उमेदवारीने राष्ट्रवादीत उत्साह

मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ शहराच्या हद्दवाढ भागातील अत्यंत महत्त्वाचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून युवा उद्योजक समीर नाईकवाडी यांनी उमेदवारीची  मागणी केली आहे. सध्या हा प्रभाग शिवसेनेच्या ताब्यात असून या प्रभागाचे प्रतिनिधित्व शिवसेना नगरसेविका सीमा पाटील या करत आहेत. तर या प्रभागाच्या लगत असलेल्या प्रभाग क्रमांक 14 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 शिवसेनेच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत पातळीवर मोठी राजकीय खलबते सुरू आहेत. शिवसेना या ठिकाणाहून कोणता उमेदवार देणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाईकवाडी परिवारातून उमेदवारीचा हुकमी पत्ता ओपन करत शिवसेनेला राजकीय शह देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. गत निवडणुकीत राष्ट्रवादीला या प्रभागातून केवळ पस्तीस मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्रभागाचा सामाजिक अभ्यास आणि राजकीय व्यूहरचना केल्यास हा प्रभाग नक्कीच राष्ट्रवादीच्या ताब्यात येऊ शकतो असा विश्वास शहरातील सर्व राष्ट्रवादी नेते आणि उपनेते त्यांना वाटत आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारी अत्यंत धोरणात्मक आणि मुत्सद्दीपणाने काढणे गरजेचे होते. त्यामुळेच या प्रभागात सर्वात मोठा जनसंपर्क असलेल्या नाईकवाडी परिवारातून उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर समीर नाईकवाडी यांचे नाव पुढे आले आहे. समीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे. नाईकवाडी यांच्या उमेदवारीच्या मोठ्या घडामोडीमुळे शिवसेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. शहराच्या दक्षिणेकडील हद्दवाढ भागातील प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारी निश्चितीपूर्वीच राष्ट्रवादीने आपले एक एक हुकमी पत्ते ओपन करण्यास सुरू केल्याने शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे हे मात्र नक्की.

कोण आहेत समीर नाईकवाडी ?
           समीर नाईकवाडी हे एक युवा उद्योजक असून त्यांनी एन वाय एन ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे.  शहराच्या दक्षिण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. नाईकवाडी परिवार गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहे. करोनासारख्या अव्हानात्मक काळात प्रभागातील शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून घरपोच केले. याशिवाय प्रभागात रक्तदान शिबीर, वृक्षरोपण शिबीर आणि शालेय साहित्याचे वेळोवेळी वाटप गरजू विद्यार्थ्यांना केले आहे. एक सामाजिक बांधिलकी जपणारा युवा चेहरा म्हणून समीर नाईकवाडी यांना ओळखले जाते. नाईकवाडी परिवारा सारख्या प्रभागात मोठा जनसंपर्क असलेल्या परिवारातून समीर यांच्या उमेदवारीबाबतचे नाव पुढे आल्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत जमेची मानली जात आहे. 
        शहराच्या दक्षिण भागात एक मातब्बर आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नाईकवाडी परिवारातील ज्येष्ठ आधारवड दिवंगत ज्येष्ठ नेते नूर मोहम्मद नाईकवाडी हे शहराला सर्व परिचित असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे नातू असलेले समीर नाईकवाडी हे शहराच्या दक्षिण भागातील एक कुशल युवा संघटक म्हणून सर्व परिचित आहेत. आजवर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला हा नाईकवाडी परिवार कधीही राजकीय क्षेत्रात उतरला नव्हता. मात्र सर्वच पक्षाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आजवर होते. या प्रभागातून समीर नाईकवाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेची निवडणूक लढवावी अशी त्यांच्या युवा समर्थकांची तीव्र इच्छा होती. याबाबतचा मनोदय त्यांच्या समर्थकांनी त्यांचे वडील राजू नाईकवाडी यांनी बोलून दाखवला. त्यानंतर आपल्या वडिलाशी चर्चा करून आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, युवानेते अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समीर नाईकवाडी यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments