Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण आंदोलनाला दीड हजार गाड्या जाणार - धनाजी साखळकर

 मराठा आरक्षण आंदोलनाला दीड हजार गाड्या जाणार - धनाजी साखळकर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मराठा समाजाने आरक्षण मिळवण्याच्या आंदोलनासाठी मुंबईला यावे असे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांनी केलेल्या आवाहनास माळशिरस तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या भरून मराठा समाजातील लोक मुंबईला जाणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयक धनाजी साखलकर यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेत दिली.

साखलकर म्हणाले, मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही संपूर्ण माळशिरस तालुक्याचा दौरा केला आहे. मराठा समाजामध्ये या आंदोलनाला जाण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला असून तालुक्यातून सुमारे दीड हजार चार चाकी गाडयांनातून सुमारे २० हजार आंदोलक मुंबईला पोहोचणार आहेत. आम्ही आंदोलनासाठी कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. ज्यांना आर्थिक मदत द्यावंयची आहे त्यांनी आंदोलनासाठी गाड्या द्याव्यात. आंदोलनापूर्वी आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाले तरी आंदोलनासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. आरक्षण मिळाले तर आम्ही गुलालाच्या गाड्या भरून मुंबईला जाऊ आणि सरकार मधील मंत्र्यांना गुलाल लावून त्यांचे आभार मानू. 50 टक्केच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. संगे सोयरेची नोंद धरावी आणि सरसकट कुणबी नोंद करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. 

यावेळी बोलताना आण्णासाहेब शिंदे म्हणाले, ज्या मराठा बांधवानाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी आता आपले भागले म्हणून गाफिल न राहता आपल्या इतर बांधवासाठी आंदोलनात सामील झाले पाहिजे. 

प्रा. डॉ. मीनाक्षी जगदाळे म्हणाल्या, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजावर खूप प्रतिकूल परिणाम होत आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आमच्या समाजाची कुचंबना होत आहे. 

या पत्रकार परिषदेसाठी मराठा कोअर कमिटीतील भारत मगर, आशुभाऊ ढवळे, गणेश इंगळे, गणेश कदम, बापू भोळे, संकेत जाधव, सागर वरकड, ओंकार क्षीरसागर, शारदा चव्हाण, विशाल केचे पाटील, सयाजीराजे गायकवाड, सचिन गायकवाड उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments