सोलापूरच्या बालाजी सरोवर प्रीमियरला ‘हॉटेल ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या बालाजी सरोवर प्रीमियर या पंचतारांकित हॉटेलने पुन्हा एकदा आपली छाप पाडत प्रतिष्ठेचा ‘हॉटेल ऑफ द इयर २०२४’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. श्रीपेरंबदूर येथे झालेल्या भव्य SYNC २०२५ या समारंभात हा पुरस्कार देण्यात आला तसेच हॉटेलचे चीफ इंजिनिअर महांतेश तोळणुरे यांना ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सरोवर हॉटेल्सचे चेअरमन अजय बकाया, सीईओ जतिन खन्ना, तसेच लूव्हर हॉटेल्स ग्रुपचे बोर्ड डायरेक्टर फेडेरिको जे. गॉन्झालेझ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘हॉटेल ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार हॉटेलचे महाव्यवस्थापक विवेक जोशी यांनी स्वीकारला, तर ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ पुरस्कार स्वतः महांतेश तोळणुरे यांनी स्वीकारला.
भारतातील तब्बल १५० हून अधिक हॉटेल्समधून आलेल्या नामांकनांमध्ये बालाजी सरोवर प्रीमियरची निवड करण्यात आली. उत्कृष्ट सेवा, ग्राहक समाधान आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळे या हॉटेलने सोलापूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूरचे नामवंत वास्तुविशारद मनोज मर्दा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी महाव्यवस्थापक विवेक जोशी आणि चीफ इंजिनिअर महांतेश तोळणुरे यांचा विशेष सत्कार केला.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले, “हा सन्मान म्हणजे व्यवस्थापन आणि संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमांचे प्रतीक आहे. आमचे ध्येय नेहमीच अतिथींना सर्वोत्तम सेवा देणे हेच राहिले असून, या पुरस्कारामुळे आमच्या टीमचा उत्साह अधिक वाढला आहे.”
0 Comments