फीट इंडीया मिशन" मध्ये सोलापूरकरांची सायकलोथॉन रॅली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी "फीट इंडीया मिशन" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वा उपक्रमामध्ये देशातील सर्व नागरिकांचा सहभाग राहावा यासाठी प्रशासकीय विभागातील सर्व घटाकांना याबाबत वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. मा. श्रीमती रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील सर्व पोलीस घटाकांना भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये" सायकल रॅली घेण्याबाबत कळवले आहे.
दिनांक २४.०८.२०२५ रोजी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर व पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने "फीट इंडीया सायकल रॅली" आयोजीत करण्यात आली होती. सदरची सायलक रॅली ही १) ५० किलोमीटर २) २५ किलोमीटर ३) १० किलोमीटर या तीन टप्यामध्ये आयोजीत केली होती. रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेण्याबाबत मा.श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापू शहर व मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी आवाहन केले होते. यावरून दिनांक २४.०८.२०२५ रोजी सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून या रैलीस मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा. श्रीमती आश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात झाली. सदरची रॅली ही सात रस्ता चौक, विजापूर रोडने सोरेगाव व नांदणी पेट्रोल पंप येथे जावून तेथून परत सात रस्ता चौक, रंगभवन चौक मार्गे पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे पोहचली. या रॅलीमध्ये मा.श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापू शहर व मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण वांच्यासह मा.श्री. विजय कबाळे, पोलीस उपायुक्त (परीमंडळ) सोलापूर शहर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह सोलापूर शहरातील स्वामी विवेकानंद पब्लीस स्कूल येथील विद्यार्थी, सोलापूर सायकल लव्हर्स या ग्रुपसह सुमारे १००० सायकलपटूनी सहभाग नोंदवला आहे. या रॅलीमधून नागरिकांना आपले आरोग्य चांगले व तंदुरूस्त राखण्याबाबतचा संदेश पोहचविण्यात आला.
पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे या रॅलीचा समारोप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मा.श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त व मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी पोलीस खात्यातील अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कर्तव्य करताना अनेकदा तणावाचा सामाना करावा लागतो. अशा वेळी नियमीत व्यायाम व संतुलीत आहार घेतल्यास आपले आरोग्य चांगले राखता येते. तरी पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार यांच्यासह नागरिकांनी आरोग्य चांगले ठेवावे असा सल्ला दिला, या फिट इंडीया सायकल रॅलीमध्ये सहभागी सायकलपटू यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल (पदक देवून सन्मानीत करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम हा मा.श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा.श्री. अतुल कुलकणी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री. विजय कवाडे, पोलीस उपायुक्त, मा. श्रीमती आश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, मा.श्री. शिरीष हुंबे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शरद बारवकर, राखीव पोलीस निरीक्षक, सोलापूर शहर, श्री. राकेशकुमार ढाकणे, राखीव पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर ग्रामीण व पोकों प्रशांत म्हमाणे, मपोकों मोनिका एकबोटे, मानव संसाधन विभाग सोलापूर ग्रामीण यांनी योग्य समन्वय ठेवून पार पाडला आहे.
0 Comments