लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा आज शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 25, 2025

लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा आज शुभारंभ

 लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा आज शुभारंभ




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथे लाईफलाईन हॉस्पिटल येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा उद्या सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याची माहिती डॉ. विश्वजित देशमुख यांनी दिली.

लाईफलाईन हॉस्पिटल म्हणजे पंढरपूर येथील नामांकित वैद्यकीय उपचारासाठी प्रसिद्ध असणारे हॉस्पिटल असुन यामध्ये त्यांनी नव्याने अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे सुरूवात करीत आहेत या नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ.शुभांगी व रमेशराव माणिकराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील,माजी आमदार शहाजी बापु पाटील, आमदार बाळासाहेब देशमुख, चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा अध्यक्ष वसंत नाना देशमुख,माजी चेअरमन भगिरथ भालके, जयसिंग देशमुख, प्रशांत भैय्या देशमुख, डॉ.ऋतुजा उत्पात, डॉ.अमरसिंह जमदाडे, डॉ.अमितकुमार आसबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी या नुतन अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages