प्रभाग १२ ला विकासाचे मॉडेल बनवणाऱ्या प्रमोद डोके यांना प्रभाग 14 मधून उमेदवारी देण्याची मागणी
प्रभाग 14 मधून केली रीतसर पक्षाकडे उमेदवारीची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 12 चे विद्यमान नगरसेवक आणि मोहोळ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा गटनेते प्रमोद डोके यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. राजकीय मार्गदर्शक आणि मोहोळ तालुक्याचे माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षापासून मोहोळ शहराच्या राजकारणात प्रमोद डोके हे सक्रिय आहेत. शिवाय ते अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये नावारूपास आलेल्या आणि सहकार क्षेत्राचे आदर्शवत उदाहरण ठरलेल्या मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन देखील आहेत. पक्षश्रेष्ठी राजन पाटील, युवानेते बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रमोद डोके यांनी मोहोळचे दक्ष आ. यशवंत माने, युवानेते अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्याकडे अर्ज दाखल करून उमेदवारीची रीतसर मागणी मोहोळ विश्रामगृहावर केली.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,नगरसेवक रोहित फडतरे, बंडू देशमुख, माजिद शेख, जयवंत गुंड पाटील, गणेश धोटे इत्यादी सह प्रभाग 12 आणि 14 मधील राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 12 हा आरक्षित झाल्याने डोके यांनी सर्वसाधारण आरक्षण झालेल्या 14 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांच्या समर्थकांची होती. प्रभाग 12 मध्ये रस्ते पाणी आरोग्य या समस्या प्रभावीपणे सोडवून प्रभागात मोठा जनसंपर्क तयार केलेल्या प्रमोद डोके यांचे नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याने त्यांच्या मित्र परिवारातील राष्ट्रवादी समर्थकांनी यांच्या उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच डोके यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करून विकासकामे कशी मार्गी लावावी हे प्रमोद डोके यांच्याकडून मोहोळ शहरातील अनेकांना शिकायला मिळाले. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात प्रमोद डोके यांनी अनेक वर्षापासून रखडलेले रस्ते आणि गटारीचा प्रश्न मार्गी लावल्याने राष्ट्रवादी हा प्रभागासाठी झटणारा पक्ष म्हणून स्थानिकांच्या मनात एक आश्वासक चित्र निर्माण होऊ शकले. राष्ट्रवादीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या विद्यमान नगरसेवकांपैकी प्रमोदबापू डोके हे एक नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षासाठी आणि पक्षातील सर्वांसाठी निरपेक्ष भावनेने झटणाऱ्या डोके यांनाच प्रभागातून उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
गत नगरपरिषद निवडणुकीत प्रमोद डोके यांनी शिवसेना आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली होती. राजकीय कारकिर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झालेली प्रमोद डोके पक्षश्रेष्ठींच्या विशेष मर्जीतील आणि विश्वासातील समर्थक म्हणून ओळखले जातात. इतक्या लहान वयात डोके यांनी नगरसेवक खेचुन घेतल्यानंतर त्यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली ती राष्ट्रवादी गटनेते पदाची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेनंतर घटक पक्षांशी संयमाने आणि शांततेत समन्वय साधत विकास कामे खेचून आणणाऱ्या प्रमोद डोके यांचे मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
0 Comments