प्रभाग 11 मधील सर्वसामान्यांची पिण्याच्या पाण्याची अडचण होणार दूर
स्वखर्चातून युवा नेते सुदर्शन गायकवाड यांनी घेतले ७०० फूट बोअरविद्युत पंप आणि पाचशे फूट पाइपलाइन करून टाकी बसवणार
मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 11 मध्ये ज्याप्रमाणे रस्त्याची अडचण आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील नेहमीच गंभीर बनतो. दर उन्हाळ्यात नागरिकांना हातपंपावर पाणी आणण्यासाठी जावे लागते. अनेक हातपंप बंद असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गायकवाड यांच्या जवळ व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारेला अनुसरून कार्यशैली असलेल्या युवा नेते सुदर्शन गायकवाड यांनी काही क्षणात प्रभागातील शिंपळकर वस्ती आणि गायकवाड वस्ती येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हेलपाटे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी बोअर घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वखर्चातून बोअर घेऊन त्यामध्ये विद्युत पंप बसवून या प्रभागातील अनेक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल स्थानिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
या उपक्रमांतर्गत स्वखर्चातून गायकवाड यांनी तब्बल 671 फूट खोल बोअर घेऊन काम सुरू केले सुदैवाने या बोरला तब्बल अडीच इंची पाणी लागले. पाण्याची उडणारे फवारे पाहून अनेक नागरिकांनी अभूतपूर्व शैलीत समाधान व्यक्त केले. त्यानंतर सुदर्शन गायकवाड यांनी सदर बोर मध्ये विद्युत मोटार बसवून सदर ठिकाणाहून तब्बल पाचशे फूट पाइपलाइन टाकून देवीच्या मंदिरासमोर पाच हजार लिटर पाणी टाकी बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणाहून अनेकांना पाणी घेऊन जाणे सोयीचे ठरणार आहे या शिवाय सदर टाकीत पाणीसाठा होणार असल्याने अधून-मधून वीज नसताना ही सर्वांना वेळेत पाणी उपलब्ध होणार आहे. याच धर्तीवर ज्या ज्या ठिकाणी अशी पाण्याची अडचण असणार आहे त्या ठिकाणी स्वखर्चातून बोअर घेऊन तेथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणार असल्याचा मनोदय सुदर्शन गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना बोलून दाखवला.
सुदर्शन गायकवाड यांनी दोनच दिवसांपूर्वी जळालेला ट्रांसफार्मर स्वखर्चातून बसवून देऊन अनेक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता गायकवाड यांनी स्वखर्चातून बोअर घेऊन त्यामध्ये विद्युत पंप बसवुन स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल प्रभागातील अनेक नागरिकांनी त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त करत कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. सुदर्शन गायकवाड यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ. राजन पाटील, दक्ष आ. यशवंत माने, युवा नेते बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी कौतुक केले आहे. या प्रभागात स्वखर्चातून सुरू केलेल्या समाजसेवी उपक्रमांच्या धडाक्यामुळे इतर पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

No comments:
Post a Comment