प्रदुषनमुक्त भारत करायचा असेल तर सायकलचा वापर करावा - शितलदेवी मोहिते पाटील
अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- सर्वांनी शाररिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सायकलिंग करणे आवश्यक आहे.तर प्रदूषण मुक्त भारत करायचा असेल तर जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा असे प्रतिपादन डॉटर मॉम फाउंडेशन अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी केले. शिवरत्न फाऊंडेशन डॉटर्स मॉम फाऊंडेशन व रोटरी क्लब अकलूज व सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिना निमीत्त खास महिला व मुलींसाठी दि १४ मार्च २० २१ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल अकलूज येथून सायक्लॉथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सौ मोहिते पाटील बोलत होत्या. प्रारंभी सदर कार्यक्रमाची सुरवात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. शिवरत्न फाऊंडेशन डॉटर्स मॉम फाऊंडेशन गेली ५ वर्षा पेक्षा अधिक वर्ष झाले महिला व मुलीसाठी अनेक चांगले उपक्रम राबवत आहे. म्हणूनच यावर्षी कोविड १९ चे सर्व नियम पाळून सायक्लॉथॉन या उपक्रमा अंर्तगत प्रदुषणमुक्त व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. सायक्लॉथॉन या उपक्रमामध्ये १० ते १५ वयोगटातील मुली व १६ ते ६० या वयोगटातील मुली व महिला २०० पेक्षा जास्त मुली व महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. उपक्रम चा सुखातीचा मार्ग हा विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल , सदुभाऊ चौक , गांधी चौक, इंदापूर रोड , आनंदी गणेश रस्ता, बोरावके वस्ती असा होता. या उपक्रमावेळी शिवरत्न शिक्षण संस्था अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर्स मॉम फाऊंडेशन अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील नितीन दोशी , बाहुबली दोशी , रोटरी कलब सदस्य, शिवरत्न व डॉटर्स मॉम फाऊंडेशन सदस्या उपस्थित होते. कार्यक्रमावेळी राजेंद्र धायगुडे यांचा विशेष सन्मान शिवामृत दुध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व डॉटर्स मॉम फाऊंडेशन अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
राजेंद्र धायगुडे सैनिक हो तुमच्यासाठी २६/१/२०२१ सकाळी ९- ०० वा ठाणे येथून शिवाजी पार्क वर छत्रपती शिवाजी महाराजांन पुष्पहार व अभिवादन करुन बांद्रा टर्मिनस येथून ट्रेन ने भूज (गुजरात) ला तेथून सायकल प्रवास सुरु केला व कोटेश्वर ( भारतातील पश्चिम दिशा जेथे सुर्यास्त होतो , पाकिस्तान बाॅर्डर) बाॅर्डर वरील जवानांना सॅल्यूट करुन गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व अरुणाचल प्रदेश (भारतातील पूर्व दिशा) जेथे सुर्योदय प्रथम होतो व भारतातील शेवटचे गांव किबीथू चीन बाॅर्डर वरील व ज्या ठिकाणी १९६२ चे भारत चीन युद्ध झाले , आपले खूप जवान शहीद झालेल्या ठिकाणी ६६००फूट उंचीवर हेल्मेट टाॅप वाॅर मेमोरियल आहे त्या ठिकाणी शहीद जवानांना अभिवादन करुन दि. ६/३/२०२१ ला किबीथूला गेलो, तेथील जवानांना सॅल्यूट करुन " सैनिक हो तुमच्यासाठी " ही सायकल राइड ३६ दिवस व ४१७० कि. मी. पूर्ण केली आहे, सायक्लॉथॉन या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन रॉयल रायर्ड्स सायकल ग्रुप तर्फे करण्यात आले. हा उपक्रम पूर्ण केलेल्या सर्व महिला व मुलीना सन्मानपत्र व मेडेल सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या उपक्रमास श्रीपूर , वेळापूर , माळशिरस , अकलूज या भागातून महिला व मुलीनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास उपस्थित रविराज इनामदार , आबा पानसरे, भगवान घाडगे, शिरीष अष्टुरकर, राजू सोनवणे या मान्यवरांचे डॉटर्स मॉम फाऊंडेशन तर्फे आभार मानण्यात आले.

No comments:
Post a Comment