अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 7, 2021

अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून योजनेसाठी गरजुंनी कर्ज मागणी  अर्ज करण्याचे आवाहन, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.  

            मांग, मातंग, मिनी.मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग, महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी, व मदिगा या समाजातील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी महामंडळामार्फत अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

            समाजातील गरजू व होतकरु तरुणांनी अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, सोलापूर येथे दूरध्वनी क्र.0217-2311523 आणि ईमेल dmlasdcsolapur@gmail.com येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages