मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त): केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावर निश्चित करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे दूरध्वनी 0217-2734950 ईमेल dcswosolapur@gmail.com वर संपर्क साधावा. इच्छुकांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्री.आढे यांनी केले आहे.
0 Comments