सेवापुस्तके अद्ययावतीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 9, 2020

सेवापुस्तके अद्ययावतीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम

सेवापुस्तके अद्ययावतीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): शासकीय अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्ययावत करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आस्थापनाविषयक कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उद्या 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी चार वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या शिबीरास जिल्हा परिषदेच्या अधिनस्त कार्यालयातील त्याचबरोबर इतर शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहू शकतात, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

प्रशिक्षणाबरोबरच 16, 17 आणि 18 डिसेंबर रोजी विशेष शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबीरे पंचायत समितीस्तरावर सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व कार्यालयास भेट देवून सेवापुस्तके अद्ययावतीकरण करण्याबाबतची कार्यवाही करायची आहे. प्रत्येक शिबीराच्या ठिकाणी अनुभवी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे, असे श्री. स्वामी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages