मोहोळ तालुका ग्रामीण भागातील मुक्कामी एसटी चालू करण्याबाबत विद्यार्थी सेनेचे एसटी वाहतूक नियंत्रण यांना निवेदन.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 9, 2020

मोहोळ तालुका ग्रामीण भागातील मुक्कामी एसटी चालू करण्याबाबत विद्यार्थी सेनेचे एसटी वाहतूक नियंत्रण यांना निवेदन..

मोहोळ तालुका ग्रामीण भागातील मुक्कामी एसटी चालू करण्याबाबत विद्यार्थी सेनेचे एसटी वाहतूक नियंत्रण यांना निवेदन..

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण असून  राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे आदेशानुसार शाळा कॉलेज शासनाचे  नियम पाळून चालू झाल्या आहेत.  तरी आपल्या मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील मुकामी गाड्या अध्याप चालू नाहीत, तरी विध्यार्थी रोज खाजगी ने प्रवास करीत आहेत. ह्या अडचणीला  विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. व खाजगी वाहन मिळे पर्यंत विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास वाहनाची वाट बघावी लागत आहे. व खाजगी वाहनांची वाट पाहत असताना विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज व शाळेच्या वेळेवर एसटी उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपली अडचण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा प्रमुख (ग्रामीण) हर्षल देशमुख यांना सांगितली. विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत  विद्यार्थी सेना मोहोळ तालुका यांच्या वतीने वाहतूक नियंत्रण व मोहोळ आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.  

विद्यार्थ्यांना पूर्ववत आपली सेवा मिळावी, व सवलत पास मिळावे व त्यांची होणारी हेळसांड थांबवावी.  गेली पंधरा दिवस झाले हा प्रकार चालू आहे. तरी लवकरात लवकर एक वाहतूक नियंत्रक व मुक्कामी गाड्या चालू कराव्यात, अन्यथा आम्हाला शिवसेना पद्धतीने आंदोलन करावे लागेल असे जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख, सहकारी समाधान वाघमोडे, योगेश चोरमुले, गणेश शेंडगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages