मोहोळसाठी निरपेक्ष भावनेने पूर्णवेळ काम करणाऱ्या दक्ष नगरसेवकांचीच गरज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

मोहोळसाठी निरपेक्ष भावनेने पूर्णवेळ काम करणाऱ्या दक्ष नगरसेवकांचीच गरज

मोहोळसाठी निरपेक्ष भावनेने पूर्णवेळ काम करणाऱ्या दक्ष नगरसेवकांचीच गरज

प्रभाग १२ किंवा ४ मधून नगरपरिषद निवडणूक लढवणार उद्योजक सुदर्शन तथा संतोष कळसे यांची घोषणा

मोहोळ (साहिल शेख)(कटुसत्य. वृत्त.): दोन नद्या दोन राष्ट्रीय महामार्ग इतकी भौगोलिक संपन्नता शिवाय सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मध्यवर्ती ठिकाणी असलेले मोहोळ शहर केवळ धोरणात्मक समन्वय नसल्यामुळे विकासापासून कोसो दूर राहिले आहे. मोहोळ शहरात ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर परिषदेची स्थापना झाल्यावर विकासाचे खरे चित्र पहावयास मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य शहरवासीयांना होती. मात्र गत पाच वर्षाच्या काळात पूर्णवेळ सक्रीय राहु शकणारे नगरसेवक अनेक प्रभागांना न मिळाल्याने बरेच प्रभाग केवळ कागदोपत्री विकसित होऊ शकले. नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासन आणि सामान्य जनता यांमधील दुवा म्हणून विकासाचा अभ्यासात्मक पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांची मोहोळ शहराला नितांत गरज आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुरुवातीपासूनच आमच्या कळसे कुटुंबियांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय प्रभाग क्रमांक चार या प्रभागात आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या बंधू-भगिनींचा समावेश आहे. या प्रभागाशी असलेली आपुलकीची नाळ कधीही आम्ही तुटू दिली नाही. येत्या काळात होणाऱ्या मूळ नगरपरिषदेची निवडणूक मी लढवावी म्हणून दोन्ही प्रभागातील कार्यकर्त्यांचा आग्रह दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनंतर दोन्ही पैकी एका प्रभागात मी हि निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे. अशी घोषणा मोहोळ येथील प्रथितयश युवा उद्योजक सुदर्शन तथा संतोष कळसे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

आपल्या मोहोळ शहरात आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाल्याचे प्रशासन आणि पदाधिकारी ठणकावून सांगत आहेत. तरीही आपल्या मोहोळला एका चांगल्या शहराची ओळख आजतागायत मिळू शकली नाही. आपल्या सर्वांचे मोहोळ हे आजही एक मोठे खेडेच असल्याचे सर्वांना जाणवत आहे. हे दरवेळेला प्रामाणिकपणे चांगल्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या मतदारांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.अशीही खंत यावेळी सुदर्शन कळसे यांनी व्यक्त केली. यापुढील काळात मोहोळ नगरपरिषदेला पूर्णवेळ तसेच दक्ष आणि जागृत नगरसेवक निवडून येणे गरजेचे आहे. ही बाब कार्यकर्त्यांनी मला पटवून दिली आहे. त्यामुळेच ही नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे असेही यावेळी सुदर्शन कळसे यांनी ठणकावून सांगितले.

मी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक पक्षाच्या प्रमुखांचे मला भ्रमणध्वनी आले. आम्ही अमुक प्रभागातून  संधी देऊ, तमुक प्रभागातून संधी देऊ असे आश्वासन देण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी खरंच माझ्या सारख्या उमेदवाराची नितांत गरज आहे त्याचबरोबर तेथील सामान्य जनतेला एक चांगला उमेदवाराची आवश्यकता आहे याची चौकस पडताळणी करून प्रभाग क्रमांक १२ किंवा ४ या दोन्हीपैकी एका प्रभागातून माझी उमेदवारी असणार आहे.राजकारणावर प्रपंच भागवण्यासाठी मी राजकारणात उतरत नसून मोहोळ शहराच्या विकासात्मक बाबींमध्ये लक्ष घालून शहराच्या विकासासाठी आलेला पै न पै नीधी योग्य पद्धतीने खर्च केला जातो की नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यासाठीच माझी उमेदवारी असणार आहे. - सुदर्शन कळसे (युवा उद्योजक मोहोळ)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages