सचिन गायकवाड यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर

सांगोला (कटुसत्य. वृत्त.): वाणीचिंचाळे गावातील सचिन सिताराम गायकवाड यांना पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था भारत यांच्या वतीने पर्यावरण मित्र हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार पर्यावरणासाठी काम करणाऱ्या लोकांना देण्यात येतो.सचिन गायकवाड यांनी कायमस्वरूपी पाणी फाऊंडेशन मध्ये जलसंधारण, तसेच गावात वनाचे प्रमाण वाढविण्यासाठी हरीत गाव हि संकल्पना राबविण्यात महत्त्वाचे योगदान तसेच गावातील शेतकऱ्यांना आपल्या मातीचा गुणवत्ता राखण्यासाठी माती परीक्षण करुन संधारण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच गावात कोणत्याही सामाजिक कामात हिरारीने सहभागी होऊन गाव व्हावी अशी अपेक्षा असते. तसेच 51वेळा रक्तदान केले आहे. तसेच मरणोत्तर देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला आहे.तसेच वाढदिवसाच्या वेळी वाढदिवस झाडे लावून साजरे करणे, तसेच घरातील नातेवाईक यांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांची राख पाण्यात न टाकता त्यावर झाड लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न केला.गावात ग्रामस्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, शेतकऱ्यांना विविध योजना माहिती देणे ,गावात झाडांची निगा राखणे व संवर्धन करणे हे काम कायमस्वरूपी करतात.
अशा विविध माध्यमातून निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाचे फलीत म्हणून पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था भारत यानी हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला. याबद्दल गावातील अनेकांनी फोनवरून अभिनंदन केले व कौतुक केले.
0 Comments