दिपकआबांच्या सक्षम नेतृत्वामुळेच शिक्षक मतदार संघातून विजय सहजशक्य झाला : प्रा.आ.जयंत आसगांवकर

सांगोला (कटुसत्य. वृत्त.): कोणत्याही मोठ्या राजकीय निवडणुकीचा अनुभव नसताना प्रथमच महाविकास आघाडीकडून पुणे विभागातून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची जबाबदारी आली, परंतु महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेतेमंडळींचे मार्गदर्शन व शिक्षक मतदारांनी दाखविलेला विश्वास तसेच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक मा आम दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच शिक्षक मतदारसंघातून विजय सहजशक्य झाला. असे प्रतिपादन नूतन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले.
मंगळवार दि 22 रोजी पुणे शिक्षक विभागाचे नूतन आमदार जयंत आसगावकर मतदार संघात आभार मानण्यासाठी आले होते यावेळी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नगरसेवक सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, सुनील भोरे, मनोज उकळे, मोहन कांबळे, अण्णासाहेब गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार असगावकर म्हणाले, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न घेऊन पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूकीला सामोरा गेलो शिक्षकांनी निवडणूक प्रचारादरम्यान महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासन व शब्दावर विश्वास ठेवून आघाडीला भरघोस मतदान केले. शिक्षकांनी महाविकास आघाडीवर जो विश्वास दर्शविला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून आगामी काळात शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सदैव विधान परिषदेत लढत राहू असा विश्वासही यावेळी जयंत आसगावकर यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील 2 मातब्बर उमेदवार विरोधात असतानाही महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच पदवीधर व शिक्षक दोन्ही उमेदवारांना जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून मतदान केले. मतदारांचा तो विश्वास सार्थ ठरवून दाखवू असेही शेवटी नूतन आमदार आसगावकर म्हणाले.
0 Comments