Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी ; जास्तीत जास्त मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी

 केंद्रीय पथकाने सांगोलामंगळवेढा तालुक्यात केली पाहणी ; जास्तीत जास्त मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी

 


सोलापूर(कटुसत्य. वृत्त.): केंद्रीय पथकाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काल सायंकाळी पाहणी केली. पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडीबामणीवाढेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावात भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावीअशी मागणी पथकातील केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पालरस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांच्याकडे केली.

पथकासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरप्रांताधिकारी उदयसिंह भोसलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मानेमहावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकरसांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटीलमंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडेतालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे शिवाजी व्होवाळ यांच्या दोन एकरातील ज्वारी आणि डाळिंबाच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. बामणी येथे अवि पोपट देशमुख यांच्या अडीच एकर डाळिंब बागेत भेट दिली.

वाढेगाव येथे गोविंद चौगुले यांच्या डाळिंब बागेत पाणी घुसल्याने बहार धरता आला नसल्याचे सांगितले. याठिकाणी ड्रोनने घेतलेल्या व्हीडिओद्वारे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे पिकात पाणी घुसल्याची माहिती पथकाला मिळाली.

कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील गणपत आवताडे यांच्या पाच एकर सूर्यफुलाचे पीक वाया गेले आहे. गेल्या 60 वर्षात असा पाऊस आणि पाणी पाहिले नसल्याचे श्री. आवताडे यांनी पथकाला सांगितले. पथकाने प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचा सल्ला दिला.  याठिकाणी रूक्मिणी सिद्धेश्वर चोरमले या महिलेच्या एक एकर बाजरी आणि एक एकर मका पिकाची पाहणी पथकाने केली. श्रीमती चोरमले यांनी जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी केली. केंद्रीय पथक अतिवृष्टीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असून त्यानंतर केंद्र सरकार मदत करणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments