Hot Posts

6/recent/ticker-posts

दस्त नोंदणीसाठी शुक्रवार, शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

दस्त नोंदणीसाठी शुक्रवाशनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

सोलापूर, (कटुसत्य. वृत्त.): राज्य शासनाने 31 डिसेंबर 2020 अखेर दस्त नोंदणी केल्यास 3 टक्के मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावादस्तऐवज नोंदणी व्हावीयासाठी शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शुक्रवारी ख्रिसमस आणि शनिवारी सुटी असल्याने जनहितार्थ कार्यालये सुरू ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी दस्त नोंदणीचा लाभ घ्यावाअसे आवाहन श्री. गिते यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments