Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्यथा.. कमरुद्दीन खतीब यांनी शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र करावा व आरपीआय(A) मध्ये जाहीर प्रवेश करावा - नगरसेवक सुरज बनसोडे

अन्यथा.. कमरुद्दीन खतीब यांनी शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र करावा व आरपीआय(A) मध्ये जाहीर प्रवेश करावा - नगरसेवक सुरज बनसोडे

सांगोला (कटूसत्य. वृत्त.):- सांगोला नगर परिषदेचे महायुती कडील स्वीकृत नगरसेवक सोमनाथ गुळमिरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले असून एका जागेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी संदर्भात अनेक जण इच्छुक आहेत. परंतु या एका जागेसाठी शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी, अशा पद्धतीची मागणी होत आहे. 

गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेमध्ये समाजाचा रोष पत्करून पदाधिकारी म्हणून  प्रामाणिक काम केलेले कमरुद्दीन खतीब यांनी सांगोला नगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या बॅनरखाली स्वखर्चाने निवडणूक लढवलेली आहे. यासाठी पक्षाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे व स्वखर्चाने निवडणूक लढवली, त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यात यांची खूप मोठी आर्थिक व सामाजिक हानी झाली असून आता नगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून शेवटचे वर्ष स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू असताना आर्थिक देवाण-घेवाण करून ज्याचे राजकारणाशी व पक्षाची काहीही संबंध नसणारी व्यक्ती स्वीकृत नगरसेवक पदी निवडीच्या हालचाली सुरू आहेत. अशावेळी ज्या व्यक्तीने पक्षासाठी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या व पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या पदाधिकारी कमरुद्दीन खतीब त्यांना महायुतीकडून स्वीकृत नगरसेवक पदी निवड करणे काळाची गरज आहे. ती त्यांच्या कामाची पोहोच पावती समजावे लागेल. परंतु तसे नाही झाल्यास कमरुद्दीन खतीब यांनी शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र करावा व आरपीआय आठवले गट या पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश करावा, असे मत आरपीआय चे जिल्ह्याचे सरचिटणीस  व सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक सुरज बनसोडे यांनी व्यक्त केलेले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments